ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांचे खासदार नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक यांना निवेदन.
मालवणच्या राजकोट किल्ल्यावर झालेल्या राडा प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी खासदार नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिलं आहे.राजकोट येथे महायुतीच्या युवासेना प्रमुखांसह राज्याचे दोन्ही विरोधी पक्षनेते हे महाराजांचा पुतळा पडल्यानंतर आमदार वैभव नाईक यांच्यासह पाहणीसाठी राजकोट येथे गेले होते. यादरम्यान त्या ठिकाणी उपस्थित असणारे भाजप खासदार नारायण राणे यांनी गोंधळ घालत माझ्यासह माझ्या सहकाऱ्याना पोलिसांसमोरच एकेकाला रात्रभर घरातून खेचून मारून टाकीन अशी धमकी दिली. याआधी सुद्धा माझे काका कैलासवासी श्रीधर नाईक यांची राजकीय वैमनस्यातून हत्या झाली आहे. सदरच्या गुन्ह्यात नारायण राणे हे तेरावे आरोपी होते. तरी त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा”, अशी मागणी ठाकरे शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.*वैभव नाईक नेमकं काय म्हणाले?*“मी, वैभव विजय नाईक वय ४८ रा. बिजलीनगर कणकवली, काल गुरुवार दि. २८/०८/२०२४ रोजी मालवण येथील राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी गेलो असताना त्या ठिकाणी उपस्थित असलेले खासदार नारायण राणे यांनी गोंधळ घालत आपल्या व आपल्या सहकारी पोलिसांसमोरच, नारायण राणे यांनी मला व माझ्या सहकार्याना “एकेकाला रात्रभर घरातून खेचून मारून टाकेन अशी धमकी दिली. या आधी सुद्धा माझे काका के. श्रीधर नाईक यांची राजकीय वैमनस्यातून हत्या झाली आहे. तेव्हा नारायण राणे हे तेरावे आरोपी होते, तरी त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, ही मागणी”, असं वैभव नाईक निवेदनात म्हणाले आहेत.