इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांचा विद्याव्रत संस्कार संपन्न
दरवर्षी प्रमाणे यंदा देखील कै. बाबुराव जोशी गुरुकुल आणि ऍड. बाबासाहेब नानल गुरुकुल रत्नागिरी येथील इयत्ता आठवीच्या मुलांचा विद्याव्रत संस्कार रविवार दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोजी ( G.G.P.S) सांस्कृतिक सभागृहात संपन्न झाला. विधिवत व्रतचिन्हाची पूजा करून केल्या जाणाऱ्या प्रत्येक विधीचा अर्थ समजून घेत हा संस्कार संपन्न झाला. विद्यार्थी आणि पालक यांच्या सहभागातून हा संस्कार सोहळा परिपूर्ण झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी विद्याव्रताची दीक्षा प्रमुख आचार्यांच्या हस्ते घेतली. वयाच्या पंचवीस वर्षापर्यंत विद्यार्थ्यांनी अभ्यासच करावा आणि आपले मन स्थिर असावे यासाठी प्रयत्न करायला हवा. प्रमुख आचार्य म्हणून रत्नागिरीतील प्रसिध्द बह्मविद्या साधक श्री भाऊ गद्रे उपस्थित होते. त्यांनी मार्गदर्शन करताना असे सांगितले की , नेहमी आपण कृती करताना ती समजून घेऊन करायला हवी तसेच प्राप्त केलेल्या ज्ञानावर पूर्ण विश्वास ठेवून उत्तम प्रयत्नांच्या साहाय्याने भविष्य उज्वल करा असे मोलाचे मार्गदर्शन त्यांनी केले. नियमित वर्तमानपत्र वाचून त्यांच्याशी घट्ट मैत्री करा असेही त्यांनी सांगितले. र.ए.संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. सोनाली पाटणकर यांच्या सहकार्याने आणि दोन्ही गुरुकुल चे प्रमुख श्री किरण सनगरे आणि श्री नितीन लिमये यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रम यशस्वी झाला.उपस्थित सर्व पाहुणे ,पालक ,शिक्षक यांचे स्वागत एड बाबासाहेब नानल गुरुकुल चे प्रमुख श्री. किरण सनगरे यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक के. बाबुराव जोशी गुरुकुल प्रकल्पाचे प्रमुख श्री. नितीन लिमये यांनी केले. सूत्रसंचालन गुरुकुल शिक्षक श्री अमोल पाश्टे यांनी केले तर दोन्ही प्रशालेतील गुरुकुल चे सर्व शिक्षक विद्याव्रत संस्कार उपक्रमाला उपस्थित होते.