रत्नागिरी जिल्ह्यात यंदा हंगामाला सुरूवात झाल्यानंतर मुसळधार पाऊस वादळी वाऱ्यामुळे प्रथमच सलग तीन दिवस मासेमारी ठप्प
सलग दुसऱ्या दिवशी वेगवान वाऱ्यासह जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले असून रत्नागिरी तालुक्यात दोन घरांचे नुकसान झाले आहे. वेतोशी येथे रस्ता खचला आहे. तसेच वादळामुळे समुद्र खवळला असून मासेमारी ठप्प झाली आहे. मुंबईच्या सुमारे तीनशेहून अधिक नौका सुरक्षेसाठी जयगड बंदरात दाखल झाल्या आहेत.कोकण किनारपट्टीवर २७ तारखेपर्यंत ताशी ३५ ते ४५ किलोमिटर पर्यंत वारे वाहण्याची शक्यता असून मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.मुसळधार पावसाचा सर्वाधिक तडाखा मच्छीमारांना बसलेला आहे. सलग तिन दिवस मासेमारी ठप्प झाली आहे. मुंबईहून मासेमारीसाठी खोल समुद्रात आलेल्या तिनशेहून अधिक नौकांनी जयगड किनाऱ्यावर सुरक्षेसाठी नांगर टाकलेला आहे. यंदा हंगामाला सुरूवात झाल्यानंतर प्रथमच सलग मासेमारी ठप्प झाली आहे