मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात बरसती रंगसरी कार्यक्रमाच्या वेळी जलधारा बरसल्या
मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात बरसती रंगसरी या कार्यक्रमाप्रसंगी कलाकार कलाविष्कार सादर करत असतानाच नाट्यगृहाच्या रंगमंचावरील छप्पराच्या स्लॅबमधून कलाकारांच्या अंगावरच श्रावणसरीच्या जलधारा कोसळल्या आणि उपस्थित प्रेक्षकांसमोरच पालिका प्रशासनाची पोलखोल झाली.नगरपालिकेला देखभाल दुरुस्तीकडे लक्ष नसेल तर मालवणीतील नाट्यप्रेमी आंदोलनाची भूमिका घेतील, अशा शब्दांत उपस्थितीत प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली.दरम्यान, कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेले मामा वरेरकर नाट्यगृह बचाव मोहीम हाती घेण्याचे आता कलाकारांबरोबरच नाट्यप्रेमी मालवणवासीयांनी घेण्याची गरज निर्माण झाली आहेभर कार्यक्रमात गळती होऊन घडलेल्या प्रकाराबाबत कलाकारांसह उपस्थित प्रेक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. गेले काही वर्षे नाट्यगृहाची दुरवस्था झाली असताना त्याकडे लक्ष देण्यास प्रशासनाला वेळ नाही, अशी टीका उपस्थितांनी केली. मामा वरेरकर नाट्यगृह हे मालवणची अस्मिता असून त्याची दुरुस्ती झालीच पाहिजे, या मागणीसाठी आंदोलनही केले जाईल, असे मत व्यक्त केले जात आहे.