मुंबईत शिवसेनेला जास्त जागा देण्यासंदर्भात बैठकीत सकारात्मक चर्चा
मुंबईत शिवसेनेला जास्त जागा देण्यासंदर्भात बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे.दिवाळीनंतर विधानसभा निवडणूक होणार असून महाविकास आघाडी त्यापार्श्वभूमीवर तयारीला लागलीय. लोकसभेत यशस्वी अजेंडा राबवल्यानंतर मविआ विधानसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना कोणत्या मुद्द्यावरुन घेरायचं याची रणनीती ठरवत आहे.विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मुंबईत बैठक सुरू आहेत. ठाकरे गटाने मुंबईतील विधानसभेच्या 36 पैकी 20 जागांची मागणी केलीय. ठाकरे गटाचा मुंबईतील असलेला बेस आणि लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला मिळालेलं प्रचंड यश यामुळे ठाकरे गटाने आघाडीकडे 20 जागा मागितल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. मुंबईतील एका जागेवर तिन्ही पक्षांनी दावा सांगितल्याने महाविकास आघाडीत एका जागेवरून पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.www.konkantoday.com