
अलिबागमध्ये आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरचा पर्दाफाश
सेक्स पॉवर वाढविण्याची औषधे घरपोच उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून अमेरिकन नागरिकांना गंडा घालणार्या आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरचा अलिबाग पोलिसांनी पर्दाफाश केला असून ३३ आरोपींना अटक केली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.अलिबाग तालुक्यातील परहूर येथील नेचर्स एज अलिबाग रिसॉर्टमधून हे ऑल सेंटर चालविले जात होते. या रिसॉर्टमध्ये आॉनलाईन जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली असता ३३ जणांना ताब्यात घेतले असून एका आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.www.konkantoday.com