बांद्रा-मडगाव लवकरच कोकणवासियांच्या सेवेत
पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून कोकणात येणारी कायमस्वरूपी रेल्वेगाडी नसल्याने कोकणवासियांची परवड सुरू आहे. या पार्श्वभूमीवर बांद्रा ते मडगाव दरम्यान आठवड्यातून दोनवेळा धावणारी रेल्वेगाडी लवकरच कोकणवासियांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. बुधवारी सदर गाडीचा प्रस्ताव रेल्वेबोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.बांद्रा ते मडगाव दरम्यान आठवड्यातून बुधवार ते शुक्रवारी धावणारी ही गाडी बांद्रा येथून सकाळी ६ वा. ५० मिनिटांनी सुटून त्याच दिवशी रात्री १० वाजता मडगावला पोहचेल. परतीच्या प्रवासात मडगाव येथून सकाळी ७ वा. ४० मिनिटांनी सुटून त्याच दिवशी रात्री ११ वा. ४० मिनिटांनी बांद्रा येथे पोहचेल. या गाडीला २१ एलएचबी डबे जोडण्याचे नियोजनही करण्यात आले असून ती वसईमार्गे धावणार आहे. ही गाडी सुरू झाल्यास पश्चिम उपनगरात वास्तव्यास असलेल्या कोकणवासियांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. www.konkantoday.com