शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी पुन्हा एकदा पुढे गेली
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी बुधवारी (दि.21) सर्वोच्च न्यायालयात पार पडणार होती.ही सुनावणी पर्यायी खंडपीठासमोर होणार होती. मात्र घटनापीठाच्या नियमित सुनावण्या आणि कामकाजामुळे पर्यायी खंडपीठासमोरील सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर पुढची सुनावणी कधी असेल याबाबत अद्याप सर्वोच्च न्यायालयाच्या वेळापत्रकात तारीख दर्शवण्यात आली नाही. ही तारीख आगामी दोन-तीन दिवसांमध्ये कळू शकेल. मात्र या प्रकरणाची सुनावणी आता थेट सप्टेंबरमध्येच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी पूर्ण होऊन निकाल लागेल का याबद्दल आता राजकीय वर्तुळात विविध चर्चा होत आहेत.