भांडूप रेल्वे स्थानकावर कोकण रेल्वेला थांबा

भांडूप रेल्वे स्थानकावर कोकण रेल्वेला थांबा देण्यास रेल्वे प्रशासनाने अनुकूलता दर्शवली असून प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने ४१ कोटीची तरतूद केली आहे.तसेच उपनगरीय गाड्यांच्या वेळापत्रकाचे नियोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे भांडुप, कांजूरमार्ग, घाटकोपर आदी भागात मोठ्या संख्येने राहणाऱ्या चाकरमान्यांचा मोठा फायदा होणार आहे.कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्या ठाण्यानंतर थेट दादर येथे थांबतात. त्यामुळे पूर्व उपनगरात भांडुप, कांजूर, विक्रोळी, घाटकोपर आदी भागात राहणाऱ्या सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात जाणाऱ्या व तेथून येणाऱ्या चाकरमान्यांना दादर अथवा ठाणे येथे उतरून पुन्हा लोकल पकडून घरी यावे लागते. यासाठी गेल्या पाच ते सहा वर्षांपासून येथील चाकरमान्यांनी भांडुप येथे कोकण रेल्वेला थांबा द्यावा अशी मागणी लावून धरली आहे. अखेर रेल्वे प्रशासनाने कोकणातून येणाऱ्या गाड्यांना थांबा देण्याचे मान्य केले. अर्थात लोकल वेळापत्रकाचे नियोजन करून व प्लॅटफॉर्मची लांबी वाढवल्यानंतर कोकण कन्या व तुतारी या दोन्ही गाड्यांना भांडुप रेल्वे स्टेशनवर थांबा देणे शक्य होणार आहे. त्यामूळे कोकणातील प्रवाशांना मोठा दिलासा ठरेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button