उदय सामंत प्रतिष्ठान व शिवसेना शहर महिला आघाडी आयोजित रत्नागिरीत श्रावणोत्सव मंगळागौर स्पर्धा व महिला आनंदोत्सव 2024
रत्नागिरी*- उदय सामंत प्रतिष्ठान व शिवसेना शहर महिला आघाडी आयोजितश्रावणोत्सव मंगळागौर स्पर्धा व महिला आनंदोत्सव 2024मंगळागौरीच्या उत्सवात, श्रावणातील पारंपारिक खेळ, झिम्मा-फुगडी, गाणी या द्वारे मनवला जातो. या भारतीय पारंपारिक सणाची भावी पिढीला माहिती व्हावी तसेच आपली संस्कृती वृध्दींगत व्हावी या हेतूने उदय सामंत प्रतिष्ठान यांचे मार्फत गेल्यावर्षी पासून मंगळागौर स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. यंदाची ही स्पर्धा रविवार दि. 01 सप्टेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे. सदर स्पर्धा हॉटेल विवेकच्या देसाई बॅक्वेट मध्ये आयोजित करण्यात आली असून दोन वयोगटामध्ये स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पहिला वयोगट 21 ते 45 असा असून दुसरा वयोगट 45 च्या पुढील महिलांचा असेल.या स्पर्धेमध्ये दोन्ही वयोगटांमध्ये स्वतंत्रपणे बक्षिसे दिली जाणार असून यामध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षिस 10000 चे असेल तसेच द्वितीय 7000, तृतीय 5000 व उत्तेजनार्थ 3000 अशा प्रकारे असेल.सदर स्पर्धा सकाळी 10.30 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आली आहे.*या स्पर्धेचे नियम व अटी खालीलप्रमाणे असतील*1. 10 मिनिटाचे सादरीकरण असेल 2. लाईव्ह अथवा रेकॉर्डींग गाणे चालेल 3. लाईव्ह गाण्यामध्ये तबला इत्यादी आवश्यक साहित्य स्वता: स्पर्धकांनी आणवयाचे आहे 4. रेकोर्डिंग मध्ये अपेक्षित गाणे रेकोर्डिंग करून आणावे. 5. पारंपारिक खेळ फुगडी व झिम्माचे प्रकार अपेक्षित 6. पोशाख व सादरीकरण महत्वाचे. 7. झिम्मा, पकवा विशेष सादरीकरणास प्रत्येक वयोगट संघातून 1 विशेष बक्षिस. 8. एका गटात कमीत कमी 10 व जास्तीत जास्त 20 महिला सहभाग घेऊ शकतात. 9. प्रॉपर्टी किंवा गाण्यातून सामाजिक संदेश देणे अपेक्षित.स्पर्धा संघ नोंदणी – 25 ऑगस्ट 2024 पर्यंत असेल.*नाव नोंदणीसाठी संपर्क -*सौ. स्मितल पावसकर – 9421230177, सौ. राजेश्वरी शेट्ये – 9970240357, सौ. शिल्पा सुर्वे – 8975838181/ 9423874981, सौ. दिशा साळवी – 9860885085, सौ. कौसल्या शेट्ये – 7030501111, सौ. श्रद्धा हळदणकर – 9370515629, सौ. वैभवी खेडेकर – 7083435999, सौ. पूजा पवार – 7741922929