
शाळेच्या विद्यार्थ्यांनी उड्डाणपुलाचा वापर करणे बाबत शिर्के स्कूलच्या ज्येष्ठ शिक्षिका साखळकर यांना सामाजिक कार्यकर्ते तन्मय दाते यांनी दिले निवेदन.
रत्नागिरी :रत्नागिरी येथील शिर्के हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उड्डाणपुलाचा वापर करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तन्मय दाते यांनी केले असून त्याबाबतचे तसे निवेदन त्यांनी दिले आहे माळनाका येथील उड्डाणपूल (ओव्हर ब्रीज) हा नागरिकांसह विशेष करून विद्यार्थी वर्गासाठी बांधला आहे. माळनाका हा शहरातील गजबजलेला परिसर आहे. येथे नेहमीच वाहतुकीची वर्दळ असते. यामुळे अपघाताच्या घटना येथे नेहमीच घडत असतात. असे असताना रा. भा. शिर्के प्रशालेचे अनेक विद्यार्थी रस्ता ओलांडताना उड्डाण पुलाचा वापर न करता थेट रस्त्यावरून धावत, मागे – पुढे होत, घोळका करून रस्ता ओलांडत असल्याचे बऱ्याचदा निदर्शनास आले आहे. यामुळे भविष्यात एखादी दुर्घटना घडू शकते. ही दुर्घटना टाळण्यासाठी आपण आपल्या विद्यार्थ्यांना पलीकडे येण्यासाठी उड्डाण पुलाचा वापर करावा, असा आग्रह धरावा किंवा शाळा सुरू होण्या आधी तसेच सुटल्यानंतर शाळेतील एखादा शिपाई मुख्य रस्त्यावर उभा करावा जेणेकरून विद्यार्थी रस्ता ओलांडताना त्यांच्यावर लक्ष राहील. यामुळे शाळेत जाणारे विद्यार्थी सुरक्षित राहतील याबाबत शाळेच्या प्रशासनाने दखल घ्यावी अशी त्यांनी मागणी केली आहे