संबंधित ट्रकमालक व चिरेखाण मालकावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची लांजा तील नागरिकांची मागणी
लांजा-दाभोळे रस्त्यावरील तळवसंबंधित ट्रकमालक व चिरेखाण मालकावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीडे-आडवलीदरम्यान चिरे वाहतूक करणाऱ्या ट्रकला झालेल्या अपघाताप्रकरणी संबंधित ट्रकमालक व चिरेखाण मालकावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी लांजा शहरातील नागरिकांच्यावतीने करण्यात आली आहे.याबाबतचे निवेदन पोलिस निरीक्षक यांना सादर करण्यात आले आहे.१२ ऑगस्टला रात्री चिरे वाहतूक करणाऱ्या एका ट्रकला लांजा-दाभोळे मार्गावरील तळवडे-आडवलीदरम्यान अपघात झाला होता. या अपघातात ट्रकचालक व क्लिनर जागीच ठार झाले होते. या ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जास्त चिरे भरलेले असल्याने हा अपघात झाल्याचे या निवेदनात म्हटले आहे. हा अपघातग्रस्त ट्रक वाहतुकीस योग्य होते का? तसेच या ट्रकची सर्व कागदपत्रे प्रमाणित आहेत का? चालकाचे ड्रायव्हर लायसन आहे का? आणि सर्वात महत्वाचे चिरे वाहतूक करण्याचा त्याच्याजवळ पास आहे का? या सर्व बाबी अतिशय महत्वाच्या असल्याने त्या पोलिस तपासात तपासण्यात याव्यात, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे