
सिंधुरत्न मधून बचतगटांसाठी चार आधुनिक बसेस,पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या आलिशान टुरिस्ट बसचे उदघाटन होणार
जिल्ह्यातील पर्यटन वृद्धीसाठी सिंधुरत्न समृद्ध विकास योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेला ४ आधुनिक बस दाखल झाल्या आहेत. हा एक पथदर्शी प्रकल्प रत्नागिरी येथे सुरू होणार आहे. १५ ऑगस्टला पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या आलिशान टुरिस्ट बसचे उदघाटन होणार असल्याचे या विभागाने सांगितले.शालेय शिक्षण मंत्री आणि योजनेचे प्रमुख दीपक केसरकर यांनी या गाड्यांची नुकतीच पाहणी केली. बचत गटांच्या प्रभागसंघाच्या माध्यमातून या बस चालविण्याचा या पथदर्शी प्रकल्पामुळे महिलांचे सक्षमीकरण होण्यास मदत होणार आहे. कोकणात पर्यटन रूजविण्यासाठी अनेक प्रयोग केले जात आहे. सिंधुरत्न समृद्ध योजनेतून जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास विभागाला या आलिशान बस दिल्या जाणार आहेत. www.konkantoday.com