
गायक आनंद शिंदे यांचे धाकटे भाऊ म्हणजेच दीनकर प्रल्हाद शिंदे यांचं निधन
आपल्या गायकीने चाहगायक आनंद शिंदे यांचे धाकटे भाऊ म्हणजेच दीनकर प्रल्हाद शिंदे यांचं निधनत्यांचं मनोरंजन करणाऱ्या या शिंदे घराण्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शिंदे घराण्यातील प्रतिष्ठित व्यक्तीचं निधन झालं आहे. गायक आनंद शिंदे यांचे धाकटे भाऊ म्हणजेच दीनकर प्रल्हाद शिंदे यांचं निधन झालं आहे. आनंद शिंदे यांनी त्यांच्या लोकगीताने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. तर वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत आदर्श आणि उत्कर्ष यांनीही त्यांचा शिंदेशाही बाणा जपला. आदर्श आणि उत्कर्ष दोघेही उत्तम गायक आहेत. उत्कर्ष या गायनाशिवाय सोशल मीडियावरही सक्रीय असतो. सोशल मीडियावर तो त्याच्या कामाबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील काही घटना प्रसंगे व आठवणी शेअर करत असतो. (अशातच उत्कर्षने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याच्या काकांच्या निधनाची दुःखद बातमी शेअर केली. बुधवारी पहाटे त्यांनी जगाचा निरोप घेतला. उत्कर्षने इन्स्टाग्रामवर त्यांच्याविषयी भावूक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने असं म्हटलं आहे की, “महागायक प्रल्हाद शिंदेचे लहान चिरंजीव, आनंद मिलिंद शिंदेंचे धाकटे भाऊ आणि विजया आनंद शिंदेचे नात्याने जरी दीर तरीही मनात स्थान मात्र पहिल्या मुलाचे. हर्षद उत्कर्ष आदर्शचे दिनू नाना. काका कमी पण दोस्त जास्त. नेहमी हसरा चेहरा, फुल ऑन एनर्जी, मस्त कलंदराच आयुष्य जगलेला एक मस्त कलाकार”.