
मालवाहतूक वाढीसाठी भागधारकांशी संबंध दृढ करणार
कोकण रेल्वे मार्गावर खेडसह रत्नागिरी रेल्वेस्थानकात कंटेनर वाहतुकीची सेवा सुरू झाली आहे. या सेवेतील मालवाहतुकीकरिता उद्योग भागधारकांशी संबंध दृढ करण्यासह कार्यक्षमतेत वाढ करण्याच्या दृष्टीने कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी मुंबई येथे कंत्राटदार व पुरवठादार यांचा मेळावा पार पडला. या बैठकीस कंत्राटदार व पुरवठादारांसह १०० प्रमुख भागधारकांनी सहभाग नोंदवला.या मेळाव्यात मालवाहतूक वाढवण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली. भागीदारी निर्माण करून निविदा प्रक्रियेत सुधारणा करणे, ऑपरेशन अडचणी कमी करणे व कोकण रेल्वे व विक्रेेते यांच्यातील दरी कमी करणे आदींबाबत सखोल चर्चा करण्यात आली.www.konkantoday.com