मला वाटतं मनसैनिकांनी प्रतिउत्तर दिले, अशी परिस्थिती कोणी निर्माण केली याचा महाराष्ट्रातील जनतेने विचार केला पाहिजे-मंत्री उदय सामंत

उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे ठाण्यातील सभेसाठी येत असताना शनिवारी (दि.१०) मुलुंड चेक नाक्याजवळ ठाकरे यांच्या गाडीवर मनसैनिकांनी शेण फेकले. त्यानंतर ठाण्यात गडकरी रंगायतन येथे जमलेल्या आक्रमक मनसैनिकांनी ठाकरे यांच्या गाडीवर बांगड्याही फेकल्या.दोन्हीकडील कार्यकर्त्यांना रोखताना पोलिसांची तारांबळ उडाली. पोलिसांनी मनसैनिकांना ताब्यात घेतल्याने पुढील राडा टळला. मात्र, या घटनेनंतर राजकीय वातावरण चांगलच तापले आहे. यावर आता मंत्री उदय सामंत यांनी आपली प्रतिक्रिया दिला आहे. ते म्हणाले, मराठवाडा दौऱ्यामध्ये राज ठाकरे यांच्या गाड्यावर सुपाऱ्या फेकल्या. सुरुवात कोणी केली? मला वाटतं मनसैनिकांनी प्रतिउत्तर दिले आहे.अशी परिस्थिती कोणी निर्माण केली याचा महाराष्ट्रातील जनतेने विचार केला पाहिजे. सुरुवातीला हे घडलं नसतं तर ठाण्यामध्ये त्याची प्रतिक्रिया आली नसती. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात उठाव केल्यानंतर ज्या हीन दर्जाने बोलले जात आहे, ते आम्ही सहन करत आहोत. शाब्दिक हल्ले समजू शकतो, पण त्यात महाराष्ट्रातील संस्कृती असली पाहिजे. राज ठाकरे यांनी त्यांच्या संघटनेसाठी केलेला दौरा होता त्याला डिस्टर्ब करायची गरज नव्हती. तसंच, मनसैनिकांना शिवसैनिकांच्या साथीने कोणतीही कृती करावी लागेल इतके मनसैनिक दुबळे नाहीत, अशीही प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button