दापोलीतील हर्णै बंदरात बिलजी मच्छिचे दर घसरल्याने मच्छीमारांनी केलेल्या आंदोलनामुळे दरवाढ
* दापोली तालुक्यातील हर्णै बंदरात बिलजी मच्छिचे दर ४० रूपये किलोपर्यंत घसरल्याने येथील मोठ्या होड्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सोमवारी बंद ठेवून दरवाढीसाठी संघर्ष छेडण्याची भूमिका घेतली. त्यामुळे मच्छी व्यापार्यांनी नमती भूमिका घेत १० रुपयांची वाढ जाहीर करत ५० रुपये किलोला देण्याची तयारी दाखवल्याने हा संघर्ष थांबवला असून काल मंगळवारी पुन्हा छोट्या होड्यांनी मासेमारीला सुरूवात करण्यात आली.www.konkantoday.com