रत्नागिरी जिह्यात आर्जु टेकसोल कंपनी पाठोपाठ महामुंबईकर नामक एका कंपनीने अनेकांना गंडा घातला
सध्या रत्नागिरी जिह्यात आर्जु टेकसोल कंपनीने रत्नागिरीकरांना कोट्यवधींचा गंडा घातलेला असतानाच आता ‘महामुंबईकर नामक एका कंपनीने अनेकांना लाखो रुपयांना चुना लावल्याचा गंभीर प्रकार पुढे आला आहे. राजापूराही या कंपनीकडून अनेकांची लाखो रूपयांची फसवणूक झाल्याची बाब पुढे असून यापैकी चार जणांनी आपली या ‘महामुंबईकर नामक एका कंपनीने फसवणूक झाल्याची तक्रार राजापूर पोलीसांत केली आहे. या चार जणांची मिळून एकूण साडेआठ लाख् रूपयांची फसवणून झाल्याचे त्यांनी केलेल्या तक्रारीवरून पुढे आले असून या प्रकरणी पोलीसांनी तपास सुरू केल्याची माहिती राजापूर पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी दिली आहे. याबाबत राजापूर पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी माहिती दिली आहे.महामुंबईकर नामक एका कंपनीने राजापूर शहरानजीक पुर्नवसन वसाहतीमध्ये आपले कार्यालय सुरू करून पैसे जमा करण्यासाठी काही प्रतिनिधींची नियुक्ती करून मोठया प्रमाणावर पैसे जमा करून अनेकांची फसवणूक केल्याची चर्चा सध्या सुरू असून या प्रकरणी ज्यांची फसवणून झाली आहे त्यांनी पुढे येऊन या विरोधात तक्रार नोंदवावी असे आवाहन पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी केले आहे.रत्नागिरी जिल्हयात अशा प्रकारे वारंवार फसवणूकीचे प्रकारे होत आहेत. मात्र त्यातुन धडा घेण्याऐवजी अनेकजण भरघोस परताव्याच्या अमिषाला बळी पडून आपली पुंजी अशा बनावट कंपन्यांमध्ये काहीही खात्री न करता गुंतवत आहेत. सध्या रत्नागिरीत आर्जु कंपनीकडून कोटयावधींची फसवणूक झाल्याचे पुढे आले असताना आता या एक नवीन ‘महामुंबईकर नामक एका कंपनीने अनेकांना गंडा घातला आहे.राजापूरातही यापुर्वी अनेकांना अशा अनेक बनावट कंपन्यांनी गंडा घातलेला असतानाही पुन्हा एकदा अनेक राजापूरकरांना या ‘महामुंबईकर नामक एका कंपनीच्या अमिषाला बळी पडले आहेत. शहरानजीक पुर्नवसन वसाहतीमध्ये आपले कार्यालय सुरू करून पैसे जमा करण्यासाठी काही प्रतिनिधींची नियुक्ती करून मोठया प्रमाणावर पैसे जमा करून अनेकांची फसवणूक केल्याची माहिती पुढे आली आहे. सध्या चार जणांनी राजापूर पोलीसांत आपली या कंपनीकडून फसवणूक झाल्याची तक्रार केली आहे. कंपनीकडून ग्राहकांकडून पैसे जमा करण्यासाठी नियुक्त करण्यात आलले हे प्रतिनिधी स्थानिक असल्याची माहितीही पुढे आली आहे.