मातोश्रीचा कडवट सैनिक असलेले, शिवसेना नेते सचिव विनायक राऊत हे नालासोपारा विधानसभा मतदार संघाकरिता उमेदवार हवे
राज्यात अडीच महिन्यांत विधानसभेच्या निवडणुका होवू घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. वसई तालुक्यातील वसई, नालासोपारा व बोईसर या तीन विधानसभेच्या जागा महाविकास आघाडी मधील उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे आहेतपक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीत वसई व नालासोपारा या दोन विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार सुनिल शिंदे व नालासोपारा विधानसभा मतदार संघात शिवसेना नेते तथा सचिव व कोकणातील ज्येष्ठ नेते माजी खासदार विनायक राऊत यांना उमेदवारी देण्याची मागणी शिवसेना जिल्हा सचिव हरिश्चंद्र पाटील यांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राने केल्याने खळबळ उडाली आहे. शिवसेना जिल्हा सचिव हरिश्चंद्र पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलेय कि, वसई विधानसभा मतदार संघात 1990 पासून दहशत असल्याकारणाने शिवसेनेचा उमेदवार निवडून येवू शकला नाही. परंतू सन 2000 पासून शिवसेनेचा उमेदवार म्हणून अन्य पक्ष व संघटनेतील उमेदवारांना संधी देण्यात आली. त्यामुळे संबंधित उमेदवारांनी शिवसेनेत गट-तट निर्माण केले. याचा पक्ष संघटनेला फटका बसला आहे. पुन्हा हे उमेदवार पक्ष सोडून गेले. अशांना अन्य पक्षाने उमेदवारी दिली तरी त्यांना यापुढील काळात शिवसैनिक कदापी साथ देणार नाही. काँग्रेसचे विजय पाटील वसई विधानसभेत तर पी.एस.फांऊडेशनचे प्रदीप शर्मा नालासोपारा विधानसभेत पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढले व पराभूत झाल्यानंतर पुन्हा स्वगृही परतले.पक्षीय अहवालानुसार वसई व नालासोपारा विधानसभा मतदार संघात स्थानिक निष्ठावंत शिवसैनिक उमेदवार म्हणून मजबूत असेल किंवा कसे ही बाब प्रश्नास्पद आहे. अशा स्थितीत निष्ठावंत आम्हा वसईकर शिवसैनिकांना बविआ पक्षासमोर मातोश्रीचा कडवट सैनिक असलेले, शिवसेना नेते सचिव विनायक राऊत हे नालासोपारा विधानसभा मतदार संघाकरिता उमेदवार हवे आहेत. नालासोपारा मतदार संघात 30 टक्के कोकणी मतदार असून एकूण 70 टक्के मराठी मतदार आहेत. माजी जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण, विरार शहर प्रमुख विजय जाधव, गणेश भायदे, प्रदीप सावंत यांसारखे कोकणी पदाधिकारी प्रभावशाली आहेत