
श्रमिक सहकारी व सुमारे एक कोटी रुपयांच्या चोरीच्या घटनेला दोन महिने लोटले तरी चोरट्यांचा माग काढण्यात यश नाही
राजापूर तालुक्यातील नाटे येथील सागरी ठाण्याच्या हद्दीत असणार्या येथील श्रमिक सहकारी व सुमारे एक कोटी रुपयांच्या चोरीच्या घटनेला दोन महिने लोटले तरी चोरट्यांचा माग काढण्यात नाटे पोलिसांना यश आलेले नाही. असे असताना चारच दिवसांपूर्वी पडवे येथील घर फोडून चोरट्यानी सुमारे दोन लाख रुपायंचे दागिने लंपास केले आहेत. एका पाठोपाठ एक घडत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे नाटे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून या चोरी प्रकरणाचा उलगडा करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.www.konkantoday.com