शिक्षणमंत्र्यांनी डी.एड. धारक बेरोजगारांना कंत्राटी पदावर शिक्षणसेवक म्हणून सामावून घेतले जाणार असल्याचा निर्णय घेतला
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डी.एड. बेरोजगार संघर्ष समितीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी डी.एड. धारक बेरोजगारांना कंत्राटी पदावर शिक्षणसेवक म्हणून सामावून घेतले जाणार असल्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय संपूर्ण महाराष्ट्र रााज्याला लागू राहिल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. असे असले तरी प्रत्यक्षात या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. एकीकडे शासनाने घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह असला तरी बी.एड. पदवीधकरांना वार्यावर सोडले आहे. यामुळे या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आमचा लढा सुरूच राहिल असा आक्रमक पवित्रा जिल्ह्यातील डी.एड., बी. एड. बेरोजगार संघर्ष समितीने घेतला आहे.www.konkantoday.com