बांग्लादेशमध्ये हिंसाचाराने आगडोंब उसळला, पंतप्रधान शेख हसीना यांचा पदाचा राजीनामा
बांग्लादेशमध्ये हिंसाचाराने आगडोंब उसळला असून आतापर्यंत जवळपास ३०० जणांचा मृत्यू झाला आहे. बांग्लादेशमध्ये सत्तापालटाचे वारे वाहू लागले असून पंतप्रधान शेख हसीना यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.शेख हसीना राजधानी ढाका सोडून सुरक्षित ठिकाणी गेल्या असल्याचे वृत्त एएफपीने दिलं आहे. बांगलादेशमध्ये लष्करी राजवट लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना राजधानी ढाका सोडून गेल्या आहेत. ढाका इथं हिंसाचाराच्या घटना घडत असून त्यांना सुरक्षित ठिकाणी नेलं आहे. शेख हसीना यांच्या जवळच्या सूत्रांनी सांगितलं की, शेख हसीना या त्यांच्या बहिणीसोबत गणभवन सोडून सुरक्षित ठिकाणी गेल्या आहेत. देशवासियांसाठी त्यांना एक भाषण रेकॉर्ड करायचं होतं पण त्यांना संधी मिळाली नाही.