आमच्या पदाधिकाऱ्यांना हेरून त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवून त्यांचे खच्चीकरण करण्यासाठीच हा सगळा खटाटोप- मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर

आरजू टेकसोल वर 578 गुंतवणूकदारांची सुमारे 7 कोटी (समोर आलेल्या तक्रारदारानुसार) रुपयांची फसवणूक केल्या प्रकारणी गुन्हे दाखल झाले व 15000 पानांचे दोषारोपपत्र दाखल झालेय ती कंपनी आमच्या पदाधिकाऱ्यां वर खंडणी सारखे गुन्हे दाखल करतेय याच्या मागे पक्षाची बदनामी करण्यासाठीच कोणाचे तरी हेतूपरस्पर षडयंत्र आहे. या कंपनीने हजारो लोकांची फसवणूक केलेली आहे फसवणूक झालेल्या लोकांनी अनेक लोकांकडे मदतीसाठी तक्रारी दिलेल्या आहेत. तश्या तक्रारी आमच्या काही कार्यकर्त्यांकडे आल्या असल्यास याचा जाब कंपनीला विचारण्यासाठी गेलेही असतील परंतु ज्या तत्परतेने पोलिस आरजू कंपनीच्या तक्रारीवर तत्परता दाखवतात त्या तत्परतेने जर आरजु कंपनीकडून फसवणूक झालेल्या सामान्य नागरिकांनी दिलेल्या तक्रारीवर तत्परता दाखवली असती तर जनतेला न्याय मिळाला असता. परंतु जर महाराष्ट्र सैनिक दोषी आढळले तर पक्ष कारवायी करेलच. यां कंपनीचे 2 संचालक अटकेत आहेत व एक फरार आहे. यांनी रत्नागिरी मधील गोरगरीब जनतेला खोटी आश्वासने देऊन त्यांची आर्थिक फसवणूक केली आहे याचा पाठपुरावा करून पोलीस प्रशासनास करावाई करण्यासाठी आमच्या महाराष्ट्र सैनिक व पदाधिकाऱ्यांनी भाग पाडले. म्हणून आमच्या पदाधिकाऱ्यांना हेरून त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवून त्यांचे खच्चीकरण करण्यासाठीच हा सगळा खटाटोप आहे असा आमचा आरोप आहे. आता हे सगळे कोण करतेय कशासाठी करतेय हे लवकरच येईल जनते समोर. आमच्या वर किती ही खोटे गुन्हे दाखल केले म्हणून आमचा महाराष्ट्र सैनिक थांबणार नाही कारण परिस्थिती जितकी गंभीर महाराष्ट्र सैनिक तिथकाच खंबीर हे या कटा मागील कलाकारने लक्षात ठेवावे असे आव्हान जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांनी दिले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button