सेल्फी काढताना मुलगी २५० फूट दरीत कोसळली
सातारा ०४:- *सज्जनगड-ठोसेघर परिसरातील बोरणे घाटात आज एक युवती डोंगराच्या कडेला सेल्फी काढताना तोल जाऊन २५० फूट खोल दरीत कोसळली . सुदैवाने ती ४० फुटांवरच एका झाडीत अडकली आणि त्यामुळे पुढचा अनर्थ टळला. ट्रेकर्समुळे तिला दुसरं आयुष्य मिळालंय. सज्जनगड-ठोसेघर मार्गावरील बोरणे गावाच्या हद्दीतील ‘मंकी पॉईंट’ परिसरात एक युवती सेल्फी काढत होती. यावेळी ही दुर्घटना घडली. सातारा शहरानजीकच्या डोंगर भाग परिसरातील हा दुसरा अपघात आहे. ठोसेघर संयुक्त वन व्यवस्थापन समिती व सातारा तालुका पोलिसांनी वेगाने बचावकार्य राबवून दरीत पडलेल्या युवतीला वाचवले. त्या युवतीला महाबळेश्वर टेकर्स व शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमने सहिसलामत बाहेर काढून साताऱ्यातील एका खासगी रुग्णालयात तिला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.