श्रीलंका येथे साऊथ एशियन म्युझिक ऍण्ड डान्स स्पोर्ट कप स्पर्धेसाठी प्रगती पवार हिची निवड
श्रीलंका येथे होणार्या एशियन गेम्स अंतर्गत साऊथ एशियन म्युझिक अँड डान्स स्पोर्ट कप २०२४ या स्पर्धेसाठी खेर्डी येथील प्रगती विकास पवार हिची भारतीय संघात निवड झाली आहे. दहा वर्षाखालील सोलो प्रकारात फिल्मी हिंदी गीतांमध्ये ती सहभागी होणार आहे. या स्पर्धेसाठी तिची निवड झाल्याने पालकमंत्री ना. उदय सामंत तसेच जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी सत्कार करत स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.www.konkantoday.com