रोपांअभावी रोहयोतील बांबू लागवड रखडली
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेंतर्गत शासनाने यावर्षी बांबू लागवडीसाठी शेतकर्यांना प्रोत्साहन दिले. त्यानुसार राजापूर तालुक्यातील शेतकर्यांकडूनही बांबू लागवडीला चांगला प्रतिसाद लाभत आहे. मात्र लागवडीसाठी आवश्यक असलेली बांबूची रोपे उपलब्ध होत नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शासनाच्या महत्वाकांक्षी बांबू लागवड योजनेला काहीसा ब्रेक लागला आहे.www.konkantoday.com