महामार्गावर तातडीने उपाययोजना करा -मंत्री उदय सामंत
महामार्गावर पडलले खड्डे, चुकीची बांधण्यात आलेली गटारे, वाड्या वस्त्यांमध्ये जाणारे जोड रस्ते याकडे पालकमंत्री उदय सामंत यांनी ठेकेदार आणि अधिकारी यांचे लक्ष वेधले आहे.यावेळी आढावा बैठकीत पालकमंत्री उदय सामंत यांनी बोलताना सांगितले की, मुंबई-गोवा व मिर्या-नागपूर या दोन राष्ट्रीय महामार्गावरील चौपदरीकरणाच्या दरम्यान सुरू असणार्या कामात असलेल्या त्रुटी व आवश्यक बाबींचे तात्काळ सर्वेक्षण करून दोन दिवसांमध्ये त्या कामांची यादी करून उपाययोजनांसाठी अहवाल तयार करा. महामार्गावर जेथे डायव्हर्जन देवून काम सुरू आहे तेथील सर्व्हिस रोड दर्जेदार करा, जेणेकरून पावसाळ्यामध्ये वाहन चालकांना त्रास होणार नाही. याची खबरदारी घ्यावी. मुंबई-गोवा महामार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्याप्रमाणे रस्त्याच्या मधील दुभाजक व बाजूच्या भिंती यांचे सुशोभिकरण करण्यात आले आहे, त्याच धर्तीवर रत्नागिरी जिल्ह्यातील सुशोभिकरणाचा प्रस्ताव तयार करावा. ग्रामस्थांना महामार्गावर जाण्यायेण्यासाठी रस्ते करून दिले पाहिजेत.तसेच मुंबई-गोवा व मिर्या -नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील पाली तिठा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा जेजे स्कूल ऑफ आर्टच्या माध्यमातून त्याचे सौंदर्यीकरण करण्याचा आराखडा तयार करून घ्यावा व त्याची उभारणी करावी. www.konkantoday.com