*मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आर्जू टेकसोल प्रा. लि. कंपनीच्या संचालककडून जवळ जवळ 1 लाख 20 हजाराची खंडणी मागितल्या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आर्जू टेकसोल प्रा. लि. कंपनीच्या संचालककडून जवळ जवळ 1 लाख 20 हजाराची खंडणी मागितल्या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे मनसेचे पदाधिकारी अमोल श्रीनाथ साईश मयेकर, शेखर नलावडे सर्व राहणार रत्नागिरी यांनी वेळोवेळी कंपनी कार्यालयात येऊन दमदाटी करून कंपनी बंद पाडण्याचा व गुन्हे नोंद करण्याच्या धमक्या देऊन कंपनीच्या लोकांकडून खंडणी घेतल्याची तक्रार दाखल झाल्याने पोलिसांनी अमोल श्रीनाथ, साईश मयेकर व शेखर नलावडे यांच्याविरुद्ध भादविका कलम 384, 385, 34 प्रमाणे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे हा गुन्हा घडला आहे.मार्च 2024 ते 24/04/2024 या कालावधीत आर्जू कंपनीचे फॅक्टरी आउटलेट समोर कुवारबाव बाजारपेठ येथील रस्त्यावर घडला होता याबाबत शहर पोलीस ठाण्यात अमोल अनिल पाटील वय वर्ष 38 वर्ष राहणार पंडये वाडी मिरजोळे यांनी दिलेल्या तक्रारी नुसार अमोल श्रीनाथ, साईश मयेकर शेखर नलावडे सर्व राहणार रत्नागिरी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.याबाबत शहर पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीप्रमाणे मार्च 2024 ते 24/ 4 /2024 या कालावधीत आर्जू एक्सल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये गुंतवणदारांनी बनवलेल्या मालाची विक्री होत नसल्याचे तसेच कंपनीमध्ये काही लोकांचे पेमेंट देणे बाकी असून काही लोकांनी काम सोडून गेले निघाल्याने सदर कंपन्यांचे आर्थिक व्यवहारतील अडचणीचा फायदा घेऊन यातील आरोपी मनसे पक्षाचे पदाधिकारी अमोल श्रीनाथ,साईश मयेकर व शेखर नलावडे सर्व राहणार रत्नागिरी यांनी वेळोवेळी कंपनी कार्यालयाचे दमदाटी करून कंपनी बंद पाडण्याचा व गुन्हे करण्याचा व गुन्हे नोंद करण्याच्या धमक्या देऊन कंपनीचे मालक प्रसाद फडके, संजय सावंत आणि जाधव तसेच अर्जुन कंपनीकडून फिर्यादी याच्या मार्फत अनिल पाटील यांच्यामार्फत अमोल श्रीनाथ ने दिनांक 22 /3/ 2024 रोजी एक लाख रुपये घेतले व फिर्यादी याच्या कंपनीतील गुंतवणूक दाराच्या नामे सायली सरफरे यांच्याकडून आरोपी नंबर दोन साईश मयेकर यांनी ते 2024 रोजी दहा हजार रुपये घेतले तर 24/ 4/ 2024 रोजी दहा हजार रुपये असे एकूण 20,000 असे अशी जबरदस्ती खंडणी मागितल्या प्रकरणी तक्रार दाखल झाली आहे.www.konkantoday.com