गुहागरचा आमदार हिंदुत्ववादी विचारांचाच असेल-भाजप प्रदेश प्रवक्ते आ. नितेश राणे
आगामी विधानसभा निवडणुकीत उत्तर रत्नागिरीतील दोन्ही आमदार आपल्या हक्काचे असले पाहिजेत, यासाठी तुम्ही सर्वांनी निर्धार करून महायुतीचे योगेश कदम गेल्यापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून आले पाहिजेत.तर गुहागरचा आमदार हिंदुत्ववादी विचारांचाच असेल असा विश्वास भाजप प्रदेश प्रवक्ते आ. नितेश राणे यांनी पाटपन्हाळे येथे भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्ह्याच्या अधिवेशनाप्रसंगी व्यक्त केला.यावेळी माजी आमदार डॉ. विनय नातू, माजी आमदार सूर्यकांत दळवी, माजी आमदार सुर्यकांत दळवी, भाजपा उत्तर त्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे, पेणचे आमदार धैर्यशील पाटील, भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष चित्रा चव्हाण, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सुरेखा खेराडे, नीलम गोंधळी, बाबा भालेकर, भाजपा चिपळूण तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर, खेड तालुकाध्यक्ष किशोर आंब्रे, चिपळूण शहर मंडल अध्यक्ष श्रीराम शिंदे, गुहागर तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, अजित थरवळ, मंडणगड तालुकाध्यक्ष अप्पा मोरे, ऋषिकेश मोरे, अनिकेत कानडे, विश्वास लोखंडे आदी उपस्थित होते.