कर्जतच्या प्रादेशिक कृषि संशोधन केंद्रातर्फे भाताचे तीन वाण विकसित
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रादेशिक कृषि संशोधन केंद्र, कर्जतच्या भात विशेषज्ञ डॉ. भरत वाघमोडे आणि त्यांच्या चमूने अथक प्रयत्नातून विकसित केलेल्या कोकण संजय, कर्जत-१० आणि ट्रॉम्बे कोकण खास या तीन विविध कालावधीच्या वैशिष्ट्यपूर्ण वाणांना राज्यस्तरीय वाण प्रसारण समितीने मान्यता दिली. कोकणातील तसेच राज्यातील भात उत्पादक शेतकर्यांसाठी विविध गुण वैशिष्ट्ये असणार्या या तिन्ही भात वाणांचे बियाणे पुढील हंगामापासून उपलब्ध करून देण्यात येतील, असे डॉ. भरत वाघमोडे यांनी सांगितले.www.konkantoday.com