उद्योगांना चार वर्षात तिप्पटीहून अधिक कर्ज वाटप
रत्नागिरी जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्रात गेल्या ४ वर्षात उद्योग क्षेत्राची आर्थिक उलाढाल तिप्पटीपेक्षा अधिक प्रमाणात वाढल्याची आकडेवारी सरकारी बँकांकडे नोंदवली गेली आहे. गतवर्षी तब्बल १ हजार ७५० कोटी रुपयांचे कर्ज वितरित झाले आहे. मात्र कर्ज घेणार्या उद्योगांची संख्या घटली आहे. औद्योगिकरणाची प्रगती अधिक असून किमान विकास दर गाठला जात असल्याच्या घोषणा सरकारी पातळीवरून होत असताना जिल्ह्यातील चित्र काही अंशी सुधारल्याचे या अनुषंगाने नोंदवले गेले आहे.अग्रणी जिल्हा बँक प्रबंधक कार्यालयाने सुक्ष्म, लघु, मध्यम स्वरूपाच्या उद्योगांना दिलेल्या कर्जाविषयी माहिती एकत्र केली आहे. सरकारी धोरणाचा भाग म्हणून उद्योगांना प्राधान्यांना कर्ज दिले जात आहे. राज्य सरकारने ठिकठिकाणी औद्योगिक वसाहती स्थापन करून उद्योजकांना चांगल्या पायाभूत सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात २०२०-२१ या आर्थिक वर्षात १९ हजार २४४ उद्योजकांना ४८९ कोटी रुपये एवढ्या रकमेच्या कर्जाचे वितरण करण्यात आले. www.konkantoday.com