रस्ते अपघातातील जखमींवर आता कॅशलेस पद्धतीने उपचार होणार
* रस्ते अपघातातील जखमींवर आता कॅशलेस पद्धतीने उपचार होणार आहेत. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत दिड लाखापर्यंत हे उपाचर केले जाणार आहेत. ही योजना सध्या प्रायोगिक तत्त्वावर चंदीगड आणि आसाममध्ये सुरू करण्यात आलेली आहे.राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण, रस्ते वाहतूक मंत्रालय यांच्यावतीने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत या योजनेची माहिती देण्यात आलेली आहे. वाहनामुळे झालेला अपघात, तसेच तो कोणत्याही रस्त्यावर झाला असेल तरीही हे उपचार मिळणार आहेत