रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी येथील विवाहितेची विहिरीत उडी मारून आत्महत्या
रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी येथील विवाहितेने अज्ञात कारणातून बाजूच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. महिमा कैलास सोनावणे (२३, मूळ रा. पुणे, सध्या रा. जाकादेवी, रत्नागिरी ) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली.ती पती आणि मुलासह जाकादेवी येथे रहात होती. शुक्रवारी पहाटे ती घरात कोठेही दिसून न आल्याने तिच्या पतीने तिचा आजूबाजूला शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा घराजवळच्याच विहिरीत तिचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसून आला.