महाविकास आघाडीतल्या सर्वांच्या कुंडल्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे फडणवीस मैदानात उतरले तर सर्वांचं वस्त्रहरण होईल- आमदार नितेश राणे
. सचिन वाजे जसे जसे बोलत जाणार तसं तसं महाविकास आघाडीचे वस्त्रहरण होणार आहे असा इशारा भाजपा नेते आमदार नितेश राणे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि महाविकास आघाडीला दिला आहे. तर पुण्यात होणारा उबाठाचा अली संकल्प मेळावा आहे असा टोलाही त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. याच पार्श्वभूमीवर एकेकाळी अनिल देशमुख यांच्या सोबत असणारे पोलीस अधिकारी सचिन वाजे यांनीच अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अनिल देशमुख त्यांच्या पीएच्या माध्यमातून वसुली करायचे असा आरोप करणारे पत्र त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे. यावर आमदार नितेश राणे यांनी देशमुख यांना जोरदार टोल लगावले आहेत. पत्रकारांशी बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले, सचिन वाजे महाविकास आघाडीचे कलेक्शन एजंट होते. त्याच्याकडे सगळीच माहिती आहे. सचिन वाजे यांनी सत्य विधान केले आहे आणि आता सत्य सचिन वाजे यांनी बोलायला सुरुवात केली आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात पेन ड्राइव्ह नाचवणाऱ्या अनिल देशमुख यांनी हिम्मत असेल तर समोर येऊन खुलासा करावा, तशी हिंमत दाखवावी असे म्हटले आहे.ते म्हणाले सचिन वाजे यांना दिशा सालीयान आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या खुना संदर्भातील सुद्धा माहिती आहे. सचिन वाजे जसं जसं बोलत जातील तसे तसे महाविकास आघाडीचे वस्त्रहरण होईल असा टोलाही त्यांनी लगावला आहे.महाविकास आघाडीतल्या सर्वांच्या कुंडल्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत. फडणवीस मैदानात उतरले तर सर्वांचं वस्त्रहरण होईल असेही नितेश राणे म्हणाले.