देव तारी त्याला कोण मारी! ५ दिवसानंतर ढिकाऱ्यातून १० जण सुखरूप बाहेर, एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश!!
वायनाड : केरळच्या वायनाडमध्ये विनाशकारी भूस्खलनात आतापर्यंत ३४४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या दुर्घटनेत अजूनही मोठ्या प्रमाणात लोक बेपत्ता आहेत. या भयंकर दुर्घटनेदरम्यान एक सुखावणारी बातमी हाती आली आहे.*भूस्खलन झाल्यानंतर दरडी कोसळून अनेक जण ढिगाऱ्याखाली दबले गेले होते. या भीषण दुर्घटनेतूनही १० जण जिवंत आढळले. यामध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश आहे. तसेच या वन विभागाच्या जवानांनी आदिवासी वस्तीतील ४ लहान मुले आणि एक पुरुष आणि महिलेचा जीव वाचवला आहे. असे एकूण १० जण जिवंत आढळले आहेत.वायनाडमधील चार गावात भूस्खलन झालं. या दुर्घटनेत चूरलमाला, अट्टामाला, नूलपुझा या सुंदर गावांचा विनाश झाला. या घटनेत ३०० हून अधिक जण मृत्यूमुखी झाले आहेत. अद्यापही शेकडो लोक बेपत्ता आहेत. अजूनही पोलीस, अग्निशमन दल, वन विभाग आणि सैन्यातील दलाकडून मदतकार्य आणि शोधकार्य सुरु आहे. या दुर्घटनेनंतर तेथील पीडित व्यक्तींना काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनी भेट दिली.टाइम्स ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, वायनाडमधील मुंडकई गावात ४५०-५०० घरे होती. दुर्घटनेनंतर या गावात ३४ ते ४९ घर शिल्लक राहिली आहेत. ३० जुलै रोजी झालेल्या भूस्खलनानंतर पूर्ण गाव उद्धवस्त झालं. या गावातील अनेक घरे जमीनदोस्त झाली आहेत. या गावात सैन्य दलाचे जवान, नौदल आणि हवाई दलाच्या जवानांकडून रेस्कू ऑपरेशन सुरु आहे.या मदतकार्यादरम्यान एकाच कुटुंबातील ४ जण जिंवत आढळले. जवानांना चिखल आणि ढिगाऱ्याखाली कोणीतरी श्वास घेतल्याचे आढळले. त्यानंतर त्यांनी या कुटुंबातील ४ जणांचा जीव वाचवला. या घटनेत त्यांचं घर वाचलं असलं तरी त्यांच्या कुटुंबियांची ताटातूट झाली आहे. ४ जण जिवंत आढळल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला.मीडिया रिपोर्टनुसार, वायनाडच्या पनिया समाजाचं एक कुटुंब डोंगराळ भागातील एका गुहेत अडकलं होतं. पथकाला त्यांच्यापर्यंत पोहोचायला साडे चार तास लागले. जवान हशीसने सांगितलं की, एक महिला आणि तिचा चार वर्षांचा मुलगा डोंगराळ भागात आढळला. त्यानंतर आणखी तीन मुले आणि त्यांचे वडीलही गुहेत अडकले होते. अशा एकूण ६ जणांचा जीव वाचवला’. हशीसने म्हटलं की, ‘लहान मुले थकले होते. आम्ही त्यांच्यासाठी जेवण घेऊन गेलो होतो. त्यांना समजावून सुखरुप खाली घेऊन आलो’. अट्टामाला येथे आल्यानंतर या लहान मुलांना कपडे आणि बुट दिले. आता ही मुले सुरक्षित आहेत’.