कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघाची 11 ऑगस्ट रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा
रत्नागिरी प्रतिनिधी : कुवारबाव परिसर जेष्ठ नागरिक संघाची 28 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 11 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 3.30 वाजता ज्येष्ठ नागरिक भवनात आयोजित करण्यात आली आहे. संघाचा वार्षिक अहवाल सर्व सभासदांकडे पाठविण्यात आलेला आहे. संघाचा 28 वा वर्धापन दिन डिसेंबर 2024 मध्ये आयोजित करण्यात येणार आहे. सभासदांच्या विवाह सोहळ्यास डिसेंबर 2024 पर्यंत पन्नास वर्षे होत आहेत, अशा दांपत्याचा यावेळी सत्कार करण्यात येणार असल्याने त्यांनी आपली नावे संघाचे कार्यवाह यांच्याकडे त्वरित सादर करावीत.त्याचप्रमाणे ज्यांच्या पाल्याने दोनही शिष्यवृत्ती परीक्षा तसेच माध्यमिक शालांत परीक्षेत 90 टक्के पेक्षा जास्त आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत 85 टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहेत अशांची माहिती गुणपत्रिकेसह लेखी अर्जाद्वारे संघाकडे वेळेत सादर करावी, म्हणजे त्यांचा सत्कार करणे शक्य होईल. सभासदांनी विविध प्रकारच्या देणग्या, आधार निधी, इमारत निधी हा संघाचे कोषाध्यक्ष यांच्याकडे जमा करून सहकार्य करावे. सर्व ज्येष्ठ नागरिक सभासद बंधू भगिनींनी या वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष श्री. मारुती अंबरे यांनी केले आहे.