सुनावणीदरम्यान न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांना झापलं
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात काढण्यात आलेले अटक वॉरंट रद्द करण्यात आले आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी हे वॉरंट काढले आहे. आजच्या सुनावणीदरम्यान हे अटक वॉरंट रद्द करण्यात आले आहे.पण सरकारी वकिलांनी अटक वॉरंट रद्द करण्याच्या कोर्टाच्या निर्णयावर आक्षेप नोंदवला आहे. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांना झापलं.सुनावणीदरम्यान कोर्टाने असे सांगितले की, ‘कोर्टाचा आदेश असताना सुद्धा मनोज जरांगे पाटील कोर्टात हजर राहिले नाही. त्यामुळे प्रकरण जुने आहे. त्याचा निपटारा लवकर होणे आवश्यक आहे. जरांगे यांनी समाज माध्यमावर कोर्टाबाबत जे वक्तव्य केले आहे ते कोर्टासमोर सरकारी वकील यांनी आणून दिलं आहे. त्यांनी कोर्टाचा अवमान केला आहे पुन्हा तसं करू नये.’तसंच, ‘कोर्ट कोर्टाच्या भूमिकवर ठाम आहे. अशा टिप्पणीमुळे मनोज जरांगे यांनी दक्षता बाळगावी कोर्टाबाबत कोणत भाष्य करू नये. मनोज जरांगे यांना गैरहजर राहिले म्हणून नवीन कायद्याप्रमाणे नेमल्या तारखेस अनुपस्थित सहज घेता येणार नाही कायदा आणि दंड लक्षात असणं आवश्यक आहे. मनोज जरांगे नवीन बंध पत्र देणे आवश्यक आहे.’, असे देखील कोर्टाने सुनावणीदरम्यान सांगितलेनाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याच्या आरोपप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यांच्या सुनावणीला हजर न राहिल्याने मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात पुणे कोर्टाने अटक वॉरंट काढले होते. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी हे अटक वॉरंट काढले आहे. यापूर्वीही जरांगे यांच्याविरोधात कोर्टात गैरहजर राहिल्याने अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले होते. त्यानंतर जरांगे मे अखेरीस कोर्टात हजर झाले होते. त्यानंतर कोर्टाने जरांगे यांना ५०० रुपयांचा दंड ठोठावून पुढील सुनावणीला नियमितपणे हजर राहण्याच्या अटींवर हे वॉरंट रद्द केले होते. परंतू त्यानंतरही जरांगे सुनावण्यांना गैरहजर राहिल्याने पुन्हा कोर्टाने त्यांच्याविरोधात अटकेचे वॉरंट काढले होते. पण आता कोर्टाने हे अटक वॉरंट रद्द केले आहे.