शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, तारांगण, सायन्स लायब्ररीची पालकमंत्र्यांनी केली पाहणी
रत्नागिरी, दि. 2 : पालकमंत्री उदय सामंत यांनी आज सकाळी येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे बांधकाम, तारांगण, सायन्स लायब्ररी यांना भेट देऊन पाहणी केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता छाया नाईक, मुख्याधिकारी तुषार बाबर, खासगी सचिव योगेश महांगडे, उपअभियंता जनक धोत्रेकर आदी उपस्थित होते. गतिने काम पूर्ण करण्याची सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.