
रोज सकाळी नऊ वाजता एक चेहरा तुम्ही दाखवता तो दाखवायचे बंद करा मग महाराष्ट्रातील राजकीय कटूता दूर होईल देवेंद्र फडणवीस यांची संजय राऊत यांच्यावर टीका
महाराष्ट्राच्या राजकारणात कटुता निर्माण झाली आहे ती कशी दूर होईल? असा प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले तुम्ही माध्यमं यासाठी जबाबदार आहात. रोज सकाळी नऊ वाजता एक चेहरा तुम्ही दाखवता. तिथून सगळी कटुता सुरु होते. त्यानंतर मग दिवसभर तेच सुरु राहतं. तुम्ही तो चेहरा दाखवणं बंद करा आठ दिवसांत महाराष्ट्रातल्या राजकारणातली कटुता दूर होईल. असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. त्यांचा इशारा संजय राऊत यांच्याकडे होता हे उघड आहे. मात्र त्यांचं नाव न घेता त्यांनी ही टीका केली.