रक्षाबंधन सणानिमित्त सर्व डाक कार्यालयांमध्ये विशेष रंगीत राखी पाकीट विक्रीस
रत्नागिरी, दि.2 ( : रक्षाबंधन सणानिमित्त जिल्ह्यामधील सर्व डाक कार्यालयांमध्ये विशेष रंगीत राखी पाकीट विक्रीस उपलब्ध करून देण्यात आले आहे. या राखी पाकिटाची किंमत १२ रुपये आहे. पाकिटातून राखी देशात विदेशात कुठेही पाठवता येईल. तरी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अधीक्षक डाकघर एन. टी. कुरळपकर यांनी केले आहे. भावा बहिणीचे नाते अधिक दृढ करणारा त्यांच्या नात्यातील प्रेमाचा गोडवा वाढविणारा आणि भावा बहिणीच्या अतूट नात्याचे प्रतीक असणारा असा रक्षाबंधन सण येत्या १९ ऑगस्ट रोजी आहे. अनेक बहिणींना प्रत्यक्ष जावून भावाच्या हातावर राखी बांधुन रक्षाबंधन सण साजरा करणे शक्य नसते. अशावेळी डाक विभागामार्फत दरवर्षी प्रमाणे जिल्हामधील सर्व डाक कार्यालयांमध्ये विशेष रंगीत राखी पाकीट विक्रीस उपलब्ध करून देण्यात आले आहे. या राखी पाकिटाची किंमत रु.१२/- आहे. या पाकिटातून राखी देशात विदेशात कुठेही पाठवता येईल. राख्या वेळेवर जाण्यासाठी विशेष सुविधा पाकिटातून राख्या भाऊरायापर्यंत रक्षाबंधनच्या आधी पोहोच करण्यासाठी राख्यांच्या पोस्ट ऑफिस बगेला वेगळे लेबल लावले जाणार आहेत. वेळेत राख्या पोहोच करण्यासाठी त्यामुळे टपालाचे वर्गीकरण करताना राखी टपालाला प्राधान्य देण्यात येणार आहे.0000