दापोली-हर्णैत छोट्या होड्यांनी मासेमारीचा श्रीगणेशा
मासेमारीवरील बंदी १ आॉगस्ट रोजी संपली असली तरी संभाव्य वादळाच्या शक्यतेने दापोली तालुक्यातील हर्णै बंदरातील मच्छिमारांनी सावधगिरी बाळगली आहे. त्यामुळे हर्णै बंदरातून मासेमारीच्या मुहूर्ताला नौका किनार्यावरच दिसून येत आहेत. मात्र छोट्या होड्यांनी मासेमारीचा मुहूर्त साधला आहे. यामुळे हर्णै बंदरात बिजली मासळी उपलब्ध झाली. www.konkantoday.com