
पोलीस भरती अंतिम निवड ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील रिक्त असलेल्या १४९ पदासाठी सुरू असलेल्या भरती प्रक्रियेत मैदानी चाचणीत पात्र ठरलेल्या एकूण १६१६ उमेदवारांपैकी १५६२ उमेदवारांनी लेखी परीक्षा दिली आहे. लेखी परीक्षेचे गुणांकन जाहीर करण्यात येवून आक्षेप नोंदविण्याची संधी उमेदवारांना देण्यात आली आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली.चालक व बॅन्डसमनच्या रिक्त ३० पदांसाठी बुधवारी लेखी परीक्षा होणार आहे. रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील रिक्त पदांसाठी सुरू असलेल्या भरती प्रक्रियेत नुकतीच लेखी परीक्षा पार पडली. एकाच दहा प्रमाणे उमेदवार लेखी परीक्षेसाठी निश्चित करण्यात आले होते. जिल्हा पोलीस दलातील रिक्त पदांसाठी १९ जूनपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. १४९ पदांसाठी ८ हजार ७१३ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते. यावेळी प्रथमच आलेल्या प्रत्येक उमेदवाराचे फेस स्कॅन करून त्याला मैदानावर प्रवेश देण्यात आला.www.konkantoday.com