जि.प.चे रत्नागिरीतील माजी अध्यक्षांच्या घरातील व्यक्तींसह्. पंचायत समितीचे माजी सदस्य, काही सरपंचांनीही किरण सामंत यांची भेट घेतली
_राज्याचे उद्योगमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी तर किरण उर्फ भैय्या सामंत यांनी राजापूर विधानसभा मतदार संघात आक्रमकपणे पक्ष बांधणीचे काम हाती घेतले आहे. उध्दव बाळासाहेब ठाकरे गटमध्ये उमेदवारीवरुन रत्नागिरी विधानसभा मतदार संघात मतमतांतरे आहेत. उदय सामंत यांना टक्कर देईल असा उमेदवार नसल्याने, अनेक पदाधिकारी सध्या चलबिचल आहेत. हेच हेरुन पालकमंत्र्यांनी अनेक ज्येष्ठ पदाधिकार्यांसह नवीन व तरुण दमाच्या पदाधिकार्यांना शिवसेनेत आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. यात जि.प.च्या माजी पदाधिकार्यांचा समावेश आहे. पालकमंत्री यांच्या अनुपस्थित बुधवारी अधिकार्यांची बैठक पार पडली. पालकमंत्री सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी विविध विकास कामांचा त्यांच्याकडून आढावा घेतला. रत्नागिरी व राजापूर मतदार संघातील अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. जि.प.चे रत्नागिरीतील माजी अध्यक्षांच्या घरातील व्यक्तींसह्. पंचायत समितीचे माजी सदस्य, काही सरपंचांनीही किरण सामंत यांची या दरम्यान भेट घेतली. शिवसेना उबाठा बरोबरच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी यांनीही लवकरच प्रवेशाबाबत दुजोरा दिला आहे. ग्रामीण भागातील उबाठाच्या पदाधिकार्यांना भेटून त्यांच्या अडचणी व विकास कामांबाबत किरण सामंत यांनी चर्चा केली. त्यामुळे उध्दव बाळासाहेब ठाकरे गटचे अनेक पदाधिकारी यावेळी सामंत यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे