कोकण मार्गावरून धावणार्या वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्यांची संख्या वाढवण्याची मागणी
कोकण मार्गावर धावणार्या वंदे भारत एक्सप्रेसला उदंड प्रतिसाद लाभत आहे. महिन्याकाठी ३० ते ३५ हजार प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे. गणेशोत्सवातील जाहीर झालेल्या गणपती स्पेशल गाड्यांचे आरक्षण हाऊसफुल्ल झाले आहे. यामुळे गणेशोत्सवात कोकण मार्गावर धावणार्या सुपरफास्ट वंदे भारत एक्सप्रेसला डबे वाढवण्याची मागणी कोकण रेल्वे प्रवाशी संघटनेने कोकण रेल्वे बोर्डाला निवेदनाद्वारे केली आहे.यंदा ७ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाची धामधूम सुरू होणार आहे. मध्य रेल्वे प्रशासनासह पश्चिम रेल्वेने जाहीर केलेल्या १२ गणपती स्पेशल फेर्यांचे आरक्षण हाऊसफुल्ल झाले आहे. प्रवाशांना प्रतीक्षा यादीवरील तिकिटे घ्यावी लागली आहेत.या पार्श्वभूमीवर कोकण मार्गावरून धावणार्या वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्यांची संख्या वाढवण्याची मागणी निवेदनात केली आहे.www.konkantoday.com