गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक श्री वल्लभ साठे सरांचे शिर्के प्रशालेच्या गुरुकुल मध्ये मार्गदर्शन.
रत्नागिरी, 30 जुलै : भौगोलिक वारसा आणि पर्यटन या विषयाला अनुसरून रत्नागिरी जिल्ह्याची सरांनी विद्यार्थ्यांना माहिती उलगडून सांगितली. रत्नागिरी जिल्ह्यातील विविध प्राकृतिक रचनांची जडणघडण कशी झाली? काळ्या, समुद्रापासून पांढरा समुद्र तेथील वाळू निर्मिती, लाल वाळूची निर्मिती, गुहा, जांभ्या खडकांची निर्मिती, झरे, किनारे, वालुकाश्म, वलीकरण, लावारसातली पोकळी इत्यादी निर्मितीची विविध गोष्टीतून माहिती दिली. तसेच पर्यावरण संरक्षण लोककल्याणासाठी निसर्ग संवर्धन करण्याची गरज अशा सर्व गोष्टींची मुलांना माहिती दिली व मुलांना गमतीशीर पद्धतीने भूगोल समजावून सांगितला.