
20 ऑगस्ट रोजी पेन्शन अदालत रत्नागिरी, दि. 29 (जिमाका) : मुख्य पोस्ट मास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबईद्वारे टपाल विभागाच्या निवृत्ती वेतन धारकांसाठी /कुटुंब निवृत्ती वेतन धारकांसाठी 55 वी पेंशन अदालत दिनांक 20 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता मुख्य पोस्ट मास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई – 400001 येथे आयोजित केली असल्याचे डाकघर अधिक्षक, रत्नागिरी यांनी कळविले आहे.
* निवृत्ती वेतनधारकांच्या लाभाशी संबंधित तक्रारी, जे टपाल विभागातून निवृत्त झाले आहेत / ज्यांचा सेवेत असताना मृत्यू झालेला आहे, टपाल विभाग, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांचे निवृत्ती वेतनधारक ज्यांचे 3 महिन्यांच्या आत पूर्तता झालेले नाही, अशा प्रकारणांचा डाक पेन्शन अदालतमध्ये विचार केला जाईल. पेन्शन अदालतमध्ये पुर्णपणे कायदेशीर मुद्द्यांसह प्रकरणे ई. वारसा प्रमाणपत्र, कल्पित पेंशन, टीबीओपी/ एमएसीपी पदोन्नती, वेतनश्रेणी वाढविणे आणि धोरणात्मक बाबींसाह शिस्तभंगाच्या आणि डी.पी.सी. च्या पुनरावलोकनासाठी प्रलंबित प्रकरणांचा विचार केला जाणार नाही. निवृत्तीवेतनधारक आपले अर्जाचे तिप्पट प्रति लेखा अधिकारी अदालत, मुख्य पोस्टमास्तर जनरल कार्यालय, महाराष्ट्र सर्कल, मुंबई जीपीओ भवन, दुसरा मजला, मुंबई 400001 ला दिनांक 31.07.2024 रोजी किंवा त्यापूर्वी वैयक्तिक रूपाने (तक्रारींची मोठ्या प्रमाणात / इतरांच्या वतीने नाही) पाठवू शकता. 31 जुलै च्या नंतर मिळालेल्या अर्जांवर पेन्शन अदालतमध्ये विचार करण्यात येणार नाही.000