जी .जी. पी.एस .मध्ये `शिक्षण सप्ताह` उत्साहात साजरा.
राष्ट्रीय शिक्षण धोरण सन 2020 अंतर्गत चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दि.22 जुलै ते 28 जुलै 2024 या कालावधीत शिक्षण सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. त्या निमित्ताने प्रशालेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सदर समारंभ 27 जुलै रोजी पंचायत समिती रत्नागिरी आणि जी.जी.पी. एस रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला. या कार्यक्रमासाठी मा. श्री सुनील पाटील गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती रत्नागिरी , तसेच श्रीम.अश्विनी काणे विषय तज्ञ, श्रीम. डॉ. स्वप्नजा मोहिते पर्यावरण शास्त्र तज्ञ , श्रीम. कोमल तावडे आहार तज्ञ ,श्रीम.जमादार मॅडम व श्रीम.जंगम मॅडम शिक्षण विभाग तसेच सोसायटीचे कार्यवाह मा.श्री सतिश शेवडे सर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम.पाटणकर मॅडम व मा.श्रीम.मूरकर मॅडम यांनी मान्यवरांचे प्रशालेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मा.श्री सतिश शेवडे सरांनी मा.गटशिक्षणाधिकारी यांचे संस्थेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रशालेचे संगीत शिक्षक मा. श्री. विजय रानडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशालेच्याच काही विद्यर्थिनिनी स्वागत पद्य सादर केले.त्यानंतर उपस्थित सर्वानी पर्यावरण प्रतिज्ञा घेतली. या कार्यक्रमांतर्गत ईको क्लब फॉर मिशन लाइफ व शालेय पोषण दिवस उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये प्रशालेच्या विद्यार्थ्यानीच औषधी वनस्पती आणि आरोग्यदायी सकस पोषण आहाराचे प्रदर्शन तसेच पावसाचे पाणी साठविण्याचा प्रकल्प,पर्यावरण जागृती विषयक तक्ते यांचे प्रदर्शन भरविले होते.संस्थेचे कार्यवाह मा.श्री.सतिश शेवडे सर यांनी फीत कापून प्रदर्शनाचे उद्घाटन केले.सर्व मान्यवरांनी प्रदर्शनाची पाहणी केली व प्रकल्प केलेल्या मुलांशी संवाद साधून मुलांचे गोड कौतुक केले. या निमित्ताने पाककृती स्पर्धा पालकांसाठी आयोजित केली होती .त्यामध्ये प्रथम क्रमांक श्रीम .राधा सौरभ देवळे,द्वितीय क्रमांक श्रीम.सुजाता साळवी,तृतीय क्रमांक श्रीम. पूर्वा प्रमोद आगाशे यांनी प्राप्त केले.त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेला 23 पालक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.परिक्षक म्हणून श्रीम.ममता नलावडे मॅडम यांनी काम पाहिले. सदर कार्यक्रमात मा.श्री.सुनिल पाटील यांनी पोषण आहार व कोकण पर्यटन याविषयी बहुमोल मार्गदर्शन केले.श्रीमती.डॉ.स्वप्नजा मोहिते यांनी जैवविविधता आणि पर्यावरण याविषयी आपले विचार व्यक्त केले तसेच आहार शास्त्र व पोषण आहाराचे महत्त्व याविषयी श्रीमती.कोमल तावडे यांनी मार्गदर्शन केले.संस्थेचे कार्यवाह मा.श्री.सतिश शेवडे यांनी आपल्या भाषणातुन संस्कारक्षम शिक्षण आमच्या शाळेतून दिले जाते असे सांगितले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रशालेच्या मुख्याध्यापिका मा.सौ.सोनाली पाटणकर मॅडम यांनी केले.सदर कार्यक्रमाला प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका मा.सौ.अपूर्वा मूरकर मॅडम,पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख मा.सौ.शुभदा पटवर्धन मॅडम या उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन गुरुकुल विभाग प्रमुख मा.श्री.नितीन लिमये सर यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी प्रशालेतील संपूर्ण शिक्षक वृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.सदर कार्यक्रमाला संस्थेच्या कार्याध्यक्षा मा.श्रीम.शिल्पाताई पटवर्धन व पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या.संपूर्ण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशालेच्या मुख्याध्यापिका मा.श्रीम.सोनाली पाटणकर मॅडम व प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका मा.श्रीम. अपूर्वा मूरकर मॅडम यांचे सर्वांना मोलाचे मार्गदर्शन लाभले .