
आता नवी मुंबईच्या वाशीतएका भरधाव इनोव्हा गाडीची रिक्षाला जोरदार धडक,रिक्षा चालकाचा मृत्यू, पहा व्हिडिओ
राज्यातील हिट अँड रनच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाहीत. पुणे, वरळी हिट अँड रनप्रकरणानंतर आता नवी मुंबईच्या वाशीमधून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.यामध्ये एका भरधाव इनोव्हा गाडीने रिक्षाला जोरदार धडक दिली आहे. ही धडक इतकी जोरदार होती की रिक्षाचा चक्काचूर झाला. यात रिक्षा चालकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. पोलिस या प्रकरणाचा सध्या अधिक तपास करत आहेत. आरोपी मद्यधुंद अवस्थेत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.नवी मुंबई शहरातील वाशी सेक्टर 9 मध्ये शनिवारी दुपारच्या वेळी साईनाथ स्कूलसमोर एका निळ्या रंगाच्या इनोव्हा कारच्या चालकाने दोन कार आणि एका ऑटोला जोरदार धडक देत पळ काढला आहे. आरोपी भगवत तिवारी हा अपघातानंतर फरार झाला आहे. तर या भीषण अपघातामध्ये ऑटो चालक मुन्नालाल गुप्ता याचा गंभीर दुखापतीमुळे मृत्यू झाला आहे.सध्या इनोव्हा कार पोलिसांच्या ताब्यात आहे. या घडलेल्या भीषण अपघाताबाबत वाशी पोलिस अधिक तपास करत आहेत. अपघाताच्या ठिकाणचे सीसीटीव्ही पोलिस ताब्यात घेत असून इनोव्हा चालकाने दारू प्यायली होती का याचा तपास सुरू आहे.