अतिवृष्टीचा गुहागर महावितरणला ५० लाखांचा फटका बहुतांशी गावे ३ दिवस अंधारात

जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत गुहागर तालुक्याच्या महावितरण विभागाला ५० लाख रुपयांचा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. यामध्ये २१ ट्रान्स्फॉर्मर जळाले तर १४५ वीजखांब पडले असून वीजवाहिन्यांचेही मोठे नुकसान झाले. यामुळे बहुतांशी गावे ३ दिवस अंधारात आहेत.यावर्षी जूनपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे. जुलै महिन्यात तर अतिवृष्टीने सर्वच स्तरावर मोठे नुकसान झाले. गुहागर तालुक्यात रस्त्यांवर झाडे उन्मळून पडणे, दरड, मातीचा भराव कोसळणे, घरांची पडझड अशा अनेक घटना घडल्या असून याचा कोट्यावधींचा फटका तालुक्याला बसला आहे. तालुक्यात १२२ गावांमध्ये शृंगारतळी सबस्टेशन विभाग वगळता आबलोली, रानवी, तळवली, हेदवी, वेळणेश्‍वर या सबस्टेशन अंतर्गत येणारी बहुतांश गावे गेली ३ दिवस अंधारात आहेत. जुलै महिन्यात २१ ट्रान्स्फॉर्मर जळाले असुन त्यांचे ३५ लाखांचे तर १४५ वीजखांबांचे ८ लाख ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button