नारायण राणे आगे बढो, हम तुम्हारे साथ नही,-आमदार भास्कर जाधव
माजी केंद्रीय मंत्री तथा भाजपचे खासदार नारायण राणे यांनी नुकतेच भाजपने राज्यातील विधानसभेच्या 288 जागा लढवाव्यात, असे विधान केले होते. यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी नारायण राणे यांची खिल्ली उडवतांना माझे राणेंशी याबबतीत एकमत असल्याचा टोला लगावला.नारायण राणे यांच्याशी माझं कधी एकमत होत नाही, पण भाजपने विधानसभेच्या सगळ्या जागा लढण्याबाबत त्यांनी केलेल्या विधानाशी मी सहमत आहे. राणे आणि त्यांच्या पक्षात हिंमत असेल तर 288 जागा लढवून दाखवाच, असे आव्हान देतानाचा नारायण राणे आगे बढो, हम तुम्हारे साथ नही, असा चिमटा काढला.माध्यमाशी बोलताना जाधव यांनी नारायण राणे यांच्यासह विविध विषयावर महायुतीवर टीका केली. महाराष्ट्राने तुमचा अहंकार मातीमोल केला, गर्व हरण केले, चारशे पारचा दावा करणाऱ्या तुम्हाला इस बार उद्धव ठाकरे यांनी तडीपार केले त्यामुळे तुम्ही महाराष्ट्राला पैसे देणार नाही का? असा सवाल करत भास्कर जाधव यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवला.